मराठा जात प्रमाणपत्र वाटपास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

- एका तासात अंबडच्या वैभवला मिळाले मराठा जात प्रमाणपत्र
​- महाराष्ट्रातलं पहिलं मराठा जात प्रमाणपत्र प्रदान

हिंगोली-  महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा जात प्रमाणपत्र देण्यास सुरवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.

वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी या जात प्रमाणपत्राचा फायदा होणार आहे. हिंगोलीमध्येही मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

विनोद तात्याराव जाधव या युवकाला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, त्याने आपल्या मित्रांना देखील प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होण्याच्या हेतूने सोशल मीडियावरती व्हायरल केलं आहे. त्यानंतर हिंगोली मधील अनेक युवक आता महा ई सेवा केंद्रावर सदरील प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हिंगोलीच्या महा ई सेवा केंद्रावर तरुणांनी रांगा लावल्या आहेत.

Web Title: Getting Certificate of Maratha Reservation in jalna and Hingoli