97 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; घनसावंगी तालुक्यातील चित्र, दुसर्‍या टप्प्यात महिलाचे आरक्षण काढण्यात येणार

In Ghansawangi taluka, reservation for the post of Sarpanch of 97 Gram Panchayats has been announced
In Ghansawangi taluka, reservation for the post of Sarpanch of 97 Gram Panchayats has been announced

घनसावंगी (जालना) : घनसावंगी तालुक्यातील नुकत्याच संपलेल्या 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर व उर्वरीत 35 असे एकूण 97 ग्रामपंचायतीच्या सरंपचपदाचे आरक्षण तहसीलदार नरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार संदीप मोरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्या उपस्थितीत गुरूवार  (ता.28) तहसील कार्यालयात सोडतीव्दारे काढण्यात आले.

यात अनुसूचित जमाती प्रवर्गात बोडखा बुद्रूक, हातडी, अनुसूचित जाती प्रवर्गात अव्वलगाव बुद्रूक, गुंज, बुद्रूक,  गुरूपिंपरी,  तिर्थपुरी,  भेंडाळा,  बाचेगाव,  कुंभारपिंपळगाव, खालापुरी, डहाळेगाव, पारडगाव, बाणेगाव, मंगरूळ,  मोहपुरी, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गात अंतरवाली टेंभी, कंडारी अंबड,  चापडगाव, चित्रवडगाव, मुरमा खुर्द, लिंबोणी, अंतरवाली दाई, अंतरवाली राठी, खापरदेवहिवरा, घाणेगाव, जिरडगाव, ढाकेफळ, भुतेगाव, मासेगाव, मुद्रेगाव, येवला, घोन्सी खुर्द, निपाणी पिंपळगाव,  पानेवाडी,  बहिरेगाव,  वडीरामसगाव,  सिंदखेड,  खडका, तळेगाव, भायगव्हाण, मांदळा, सर्वसाधारण प्रवर्गात मुढेगाव,  यावलपिंपरी,  राजाटाकळी, राहेरा, लिंबी, शिंदेवडगाव, शिवनगाव, श्रीपतधामणगाव, उक्कडगाव, देवडीहादगाव, देवीदहेगाव, माहेरजवळा, विरेगव्हण तांडा,  शेवगळ,  शेवता,  राणीउचेंगाव, सरफगव्हाण, करडगाव, करडगाववाडी, कोठी, देवहिवरा, दैठणा खुर्द, पांगरा, पाडुळी बुद्रूक, मच्छिंद्रनाथ चिंचोली,  रवना,  रांजणी,  रांजणीवाडी,  राजेगाव, गाढेसावरगाव, जांबसमर्थ, दहीगव्हाण बुद्रूक, पिंपरखेड बुद्रूक,  बोधलापुरी,  मानेपुरी,  मूर्ती, यावलपिंपरी तांडा, रामसगाव, साकळगाव, सिध्देश्वर पिंपळगाव,  अरगडेगव्हाण, कंडारी परतूर, कोठळा बुद्रूक, खडकावाडी, घोन्सी तांडा, घोन्सी बुद्रूक, जोगलादेवी, दैठणा बुद्रूक,  नागोबांचीवाडी,  पिरगॅबवाडी,  बोररांजणी,  बोलेगाव, भादली, भोगगाव, मंगूजळगाव यांचा समावेश आहे. ही सोडत लहान मुलगा जयदीप प्रल्हाद नाईक यांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली. यावेळी काशीनाथ शेंबडे, विठ्ठल कथले, राजेश भोसले यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

हे ही वाचा : शेती हे शेतकऱ्यांचे हृदय तर शेतरस्ते रक्तवाहिन्या
 
महिलांसाठी राखीव पदाचे आरक्षण

तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पहिल्या टप्प्यात तहसील कार्यालयात पुरूषाकरीता जाहीर करण्यात आले आहे. यात महिलांच्या  सरपंचपदाचे आरक्षण दुसर्‍या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे सोमवारी (ता.एक) रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता आरक्षण कोणते सुटते याकडे लक्ष लागले असून शासनाच्या दोन टप्यात काढण्यात येणार्‍या आरक्षणासंबधीही चर्चा होत आहे.
 
उर्वरीत ग्रामपंचायतीचे आरक्षण काढल्याने घोडेबाजार थांबणार का?

घनसावंगी तालुक्यात नुकत्याच 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या असून उर्वरीत 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीत दोन टप्प्यात होणार आहे. राज्यात निवडणूक आयोगांच्या प्रथेप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी संपूर्ण जालना जिल्ह्यात सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. परंतु राज्य शासनाने सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीच्या आधी जाहीर झाल्याने निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याचे कारण पुढे करून हे आरक्षण रद्द करण्यात आले.

दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेत हा निर्णयाविरूध्द अपील करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने या आरक्षणातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे काढण्यात आलेले आरक्षण ठेवण्यात आले. उर्वरीत प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे नुकत्याच संपलेल्या 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात शासनाचा हा निर्णय समजवू शकतो. परंतु आगामी दोन ते तीन वर्षानंतर तालुक्यातील जवळपास 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही का? असा प्रश्‍न पुढे येत आहे. यासंबधी निवडणूक विभागास विचारणा केली असता त्यांनी कानांवर हात ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com