लातूर जिल्ह्यात एक हजार घरकुलांचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

लातूर - येथील जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी (ता. दोन) आवास दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात एकाच दिवशी एक हजार घरकुलांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी जिल्ह्यात घरकुलांची कामे वेळेत व्हावीत, याकरिता लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. या कामाला गती यावी, याकरिता त्यांनी विभागप्रमुखांनाही कामाला लावले आहे. 

जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये मंजुरी दिलेल्या प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास व पारधी आवास योजनेतील केवळ तीस टक्के घरकुले पूर्ण आहेत. २०१७-१८ मध्ये मंजुरी दिलेल्या घरकुलांपैकी केवळ दहा टक्के घरकुले पूर्ण आहेत. तर २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलास पात्र लाभार्थींचे सर्व उद्दिष्ट प्राप्त होण्याची शक्‍यता आहे.

घरकुलाच्या कामाची गती पाहता श्री. ईटनकर यांनी आता विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात ता. दोन जुलै रोजी आवास दिन साजरा होत असून या एकाच दिवशी एक हजार घरकुलांचे भूमिपूजन करण्याचे आदेश श्री. ईटनकर यांनी दिले आहेत. 

घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात येत आहे. घरकुलांच्या कामासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यास निधी वितरणास अडचणी येतात हे लक्षात घेऊन लाभार्थींसाठी लकी ड्रॉची योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक पंधरवड्यात १ आणि १६ तारखेला त्या पंधरवड्यात घरकुल पूर्ण करणाऱ्या लाभार्थींसाठी ही योजना असणार आहे. यात सीलिंग फॅन, टेबल फॅन, भांडी असे बक्षीस दिले जाणार आहे. लोकवर्गणीतून हा खर्च केला जाणार आहे.

लाभार्थींसोबतच उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, स्थापत्य आभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचाही गौरव करण्यात येणार आहे.  आवास दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर सामुदायिक गृहप्रवेशाचे कार्यक्रम घ्यावेत.

सरपंच व ग्रामसेवकांनी लाभार्थींना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्याच्या सूचनाही श्री. ईटनकर यांनी दिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून बेघरांना घरकुल देण्याची योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: gharkul in Latur District