घाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी

Ghati-Hospital
Ghati-Hospital

औरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग विभागात १५ रेडिएंट वॉर्मर, तर भूलशास्त्र विभागात एक ‘ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन’च्या खरेदीचे कार्यादेश ‘हाफकिन’ने गेल्या आठवड्यात दिले.

घाटीला ‘डीपीसी’तून सव्वा दोन कोटींचे अनुदान वर्ष २०१७-१८ च्या यंत्र खरेदीसाठी मंजूर करण्यात आले होते. त्याला कर्जमाफीनंतर कात्री लावण्यात आल्याने ही रक्कम १.५४ कोटी करण्यात आली. त्यानंतर या खरेदीच्या प्रशासकीय मान्यतेला दहा महिन्यांचा कालावधी लागला, तर प्रशासकीय मान्यतेनंतर आर्थिक वर्ष संपले तरी हाफकिनमुळे खरेदी रखडली होती. त्याला गेल्या आठवड्यात मुहूर्त मिळाल्याने डीपीसीच्या निधीतून प्रस्तावित यंत्रांपैकी १५ रेडिएंट वॉर्मर व एक ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन खरेदी करण्याचे आदेश हाफकिनने संबंधित कंपनीला दिले आहेत. 

सहा आठवड्यांत हा पुरवठा करण्याची डेडलाइनही कंपनीला दिली आहे. या यंत्रांची किंमत ३० लाखांच्या जवळपास असून, अजून सव्वाकोटींच्या यंत्र खरेदीकडे घाटीचे लक्ष लागले आहे.

सीटी स्कॅन, एमआरआयची प्रतीक्षा 
डीपीसीतून घाटीला सीटी स्कॅन यंत्रांसाठी सात कोटी, तर एमआरआय यंत्रांसाठी शिर्डी संस्थानकडून १५ कोटी रुपये मिळाले आहेत. हे पैसे हाफकिन महामंडळाकडे वर्ग करण्यात आले आहेत. सध्या सीटी स्कॅन फक्त आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी सुरू आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना निदानासाठी खासगी दवाखान्यांत जावे लागत आहे. त्यामुळे या यंत्रांच्या खरेदीला गती मिळण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com