घाटीत गॅस सिलिंडरच्या गोडाऊनला धोक्‍याची घंटा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

घाटीत सर्जिकल इमारतीत लिफ्ट क्रमांक दोनजवळ असलेल्या सिलिंडरच्या गोडाऊनचे शेड मोडकळीस आले आहे. यात ऑक्‍सिजन आणि नायट्रस गॅसचे सिलिंडर ठेवले जातात. शंभरहून अधिक सिलिंडर तेथे ठेवलेले आहेत. या खोलीची प्रचंड दुरवस्था झाली असून, खोलीला गळती लागली आहे. या पाण्यामुळे सिलिंडरलाही धोका पोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद : घाटीतील मॅन्युअली ऑक्‍सिजन सिस्टिमसाठी विविध अत्यावश्‍यक गॅस सिलिंडर ठेवण्यासाठी असलेल्या गोडाऊनला पावसाच्या पाण्याची गळती लागली आहे. या पत्र्याच्या खोलीत सिलिंडरखाली पावसाचे पाणी साचल्याने गंज लागून सिलिंडर फुटून अपघात होण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. 

घाटीत सर्जिकल इमारतीत लिफ्ट क्रमांक दोनजवळ असलेल्या सिलिंडरच्या गोडाऊनचे शेड मोडकळीस आले आहे. यात ऑक्‍सिजन आणि नायट्रस गॅसचे सिलिंडर ठेवले जातात. शंभरहून अधिक सिलिंडर तेथे ठेवलेले आहेत. या खोलीची प्रचंड दुरवस्था झाली असून, खोलीला गळती लागली आहे. या पाण्यामुळे सिलिंडरलाही धोका पोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या खोलीची शुक्रवारीच (ता. सहा) पाहणी केली असून याच्या डागडुजीसाठी सोमवारपासून सुरवात केली जाणार आहे. पत्रेही बदलण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: ghati hospital in Aurangabad