घाटीच्या सन्मानजनक मातृत्व उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव 

hospital
hospital

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सन्मानजक मातृत्वाच्या संकल्पनेची वर्षभरापूर्वीच राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. पुन्हा या उपक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या पुस्तकात स्थान देऊन केंद्र शासनाने गौरविले आहे; तसेच स्त्रीरोग विभागाच्या रिस्पेक्‍टफूल मॅटर्निटीच्या कामाला बळकटी देण्यासाठी एक कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

देशभरात प्रसूती सुलभ करण्यासाठी विविध संशोधने होत आहेत. त्यात असंख्य संशोधने व उपायोजना या खर्चिक आहेत. मात्र, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या नेतृत्वात घाटीने सुरू केलेली सन्मानजनक मातृत्वाची सात सूत्री संकल्पना राबविण्यासाठी कोणताही खर्च नाही. शून्य खर्चात सुरू केलेल्या संकल्पनेचे सकारात्मक परिणाम झाल्याचे घाटीने गेल्या वर्षभरात सिद्ध केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आयुक्त दिनेश बसवाल यांनी घाटीला दिलेल्या भेटीत या कामाची प्रशंसा केली होती. त्या वेळी आरोग्य संचालनालयाच्या डॉ. अर्चना पाटील यांनीही या कामाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ठ केले होते. 

त्याअनुषंगाने केंद्र शासनाने रिस्पेक्‍टफूल मॅटर्निटीच्या कामाला साहाय्य करेल अशा सुधारणा करण्यासाठी एक कोटी रुपयांची दुरुस्ती, सुविधा व पुनर्रचना करण्यासाठी आर्किटेक्‍ट नेमला आहे. ते दिवाळीनंतर या कामाला सुरवात करतील. यामुळे घाटीच्या प्रसूती विभागात चांगल्या सुविधांची निर्मिती लवकरच केली जाईल; तसेच केंद्र शासनाच्या पुस्तकाच्या माध्यमातून देशभरात या संकल्पनेला राबवायला मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com