घाटीचे १२ डॉक्‍टर पळविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये वाढविली, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या जागांची वाढ करण्यात आली. मात्र, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरी शिक्षकांची नव्याने भरती झाली नसल्याने यंदाच्या ‘एमसीआय इन्स्पेक्‍शन’साठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्यातील दहा महाविद्यालयांतून २९ डॉक्‍टरांचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) पाचारण केले. त्यात घाटीच्या १२ डॉक्‍टरांनाही पळविण्यात आल्याने घाटीतील वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. 

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी डॉक्‍टरांची नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील यूजी व पीजीचे एमसीआय इन्स्पेक्‍शन झाले, तेथील डॉक्‍टरांची बदली जळगावला करण्यात आली. त्याचा सर्वांत मोठा फटका औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाला व रुग्णालयाला बसला आहे. घाटीचे तीन विभागप्रमुख, तीन सहयोगी प्राध्यापक, पाच सहायक प्राध्यापक पळवल्याने खान्देशसह विदर्भ, मराठवाड्याच्या पंधराहून अधिक जिल्ह्यांचा भार असलेल्या घाटी व शासकीय कर्करोग रुग्णालयाची रुग्णसेवा यामुळे प्रभावित होणार आहे.

यांची झाली बदली 
विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डॉ. मारुती पोटे, डॉ. सईदा अफरोज, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील आपटे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. अंजली कुलकर्णी, कर्करोग रुग्णालयातील सहायक प्राध्यापक डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अब्दुल राफे कादरी, डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. गणेश लोखंडे यांची बदली केल्याचे डीएमआरईच्या आदेशात म्हटल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

Web Title: ghati hospital doctor transfer