घाटीत पास योजना आजपासून पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

औरंगाबाद - घाटीतील नातेवाइकांची गर्दी कमी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संशोधनाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी इंचार्ज सिस्टरने नियोजन व वितरणाची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश २५ मे रोजी दिले.

त्या सांदर्भात गुरुवारी (ता. ३१) पार पडलेल्या बैठकीत ही पास योजना शुक्रवारपासून (ता. एक) सुरू करण्याचा निर्णय झाला. त्याचे कार्यालयीन आदेश गुरुवारी काढण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. 

गेल्या नोव्हेंबर महिन्यात घाटीच्या मेडिसीन विभागात निवासी डॉक्‍टरला मारहाण झाली. त्यानंतर नातेवाइकांची गर्दी कमी करण्यासाठी अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी नव्या पास तयार करून गळ्यात लटकवण्याची पास सिस्टीम डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आली; मात्र सुरवातीलाच परिसेविकांनी वितरण व नियोजनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला.

त्यावेळी अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी एक महिना प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू केली. त्याचा काहीसा चांगला परिणामही झाला होता; मात्र डिसेंबरअखेर इंचार्ज सिस्टरांनी पासचे गाठोडे अधीक्षकांना परत केले.

त्यामुळे गेली चार महिने पास सिस्टीम बंद होती. त्यांनतर पुन्हा डॉक्‍टरांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने मार्डने नातेवाइकांची गर्दी कमी करण्यासाठी आग्रह धरला. घाटी प्रशासनाने लेखी आश्‍वासन देत जुन्या पाच लाख पडलेल्या छापील पासवर पास यंत्रणा सुरू केली; मात्र ती प्रभावी न ठरल्याने गर्दीवर नियंत्रण होऊ शकले नाही. 

त्यामुळे पुन्हा डिसेंबरमध्ये महिनाभरात गुंडाळलेली गळ्यात लटकवण्याची सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी डॉ. सोनवणे यांनी शुक्रवारी इंचार्ज सिस्टर व मार्ड संघटनेचे निवासी डॉक्‍टर, पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर पास सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. ही पास दर्शनी ठेवण्याची सुविधा असल्याने सुरक्षारक्षकांना विनापास असलेल्या नातेवाइकांना बाहेर काढण्यास सोपे होणार आहे. 

Web Title: ghati hospital pass scheme