"त्या' व्हायरल फोटोवरून "घाटी'ची कानउघाडणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी आज घाटी रुग्णालयाची पाहणी केली. दरम्यान, चिमुकलीच्या हातात सलाइन दिल्याच्या व्हायरल फोटोवरून त्यांनी घाटी प्रशासनाची कानउघाडणी केली. लहाने यांनी फोटोतील चिमुकलीच्या हाती सलाइन का दिली, असा प्रश्‍न विचारत 'दोन मिनिटे नव्हे, तर साडेसात मिनिटे ती मुलगी ताटकळत उभी होती. तुमच्या चुकांमुळे राज्यभर उत्तरे द्यावी लागत आहेत,'' अशा तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "घाटी'त 5 मे रोजी सलाइनचे स्टॅंड नसल्याने वडिलांवर उपचार सुरू असताना मुलीला सलाइन हातात घेऊन उभे राहावे लागले होते. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची केंद्रासह राज्य शासनाने दखल घेत "घाटी'कडे विचारणा केली होती.
Web Title: ghati hospital viral photo