कापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील  एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची घटना आज (सोमवार) घडली.

मानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील  एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची घटना आज (सोमवार) घडली.

गोपाल विजयकुमार तोष्णीवाल यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ११ एप्रिल रोजी मी संत भगतराम जिनिंग कार्यालयात बसलेलो असताना बाबा हालनोर, उद्धव पुणेकर, गणपत शिंगारे, विष्णू बनगर, सीताराम सलगर, सिद्धार्थ हालनोर व अन्य दोन जण जिनिंगच्या कार्यालयात घुसले व तू आमच्या कापसाला भाव का देत नाही? असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करायला सुरुवात केली. कार्यालयात असणाऱ्या रामनिवास सारडा व रामा वैद्य यांनाही यावेळी मारहाण केली. तसेच तु मला आता  पंधरा लाख रुपये दे अन्यतः तुला व तुझ्या परिवाराला रस्त्यावर दिसल्यावर जीवे मारू अशी धमकी दिली.

मारहाण झालेल्या प्रकाराचे जिनिंगच्या कार्यालयातील सीसीटीव्हीत चित्रीकरण झालेले आहे व फिर्यादीने ते पोलिसांना दिले. सदरील तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात वरील सहा सह अन्य दोघांवर बेकायदेशीर जमाव करणे, बळजबरी कार्यालयात घुसून मारहाण करणे, खंडणी मागणे व जिवेमारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोऊनि शिवशंकर मनाळे करीत आहेत.

Web Title: ginning assault on the price of cotton