प्रेमाची कबुली देण्यासाठी अल्पवयीन मुलीला स्वच्छतागृहात डांबले

मंगेश शेवाळकर
शनिवार, 22 जून 2019

दरम्यान शुक्रवारी (ता. २२) दुपारी साडेतीन वाजता ती मुलगी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी शाळेत जात असताना त्या अल्पवयीन प्रेमवीराने त्याचा मित्र विशाल कुंडलिक माने (वय 18) याला सोबत घेत त्या मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर त्या मुलीस रस्त्यात आडवले मात्र त्याला ढकलून देत मुलगी पुढे निघाली. यावेळी विशाल माने याने त्या मुलीस एका बंद घराच्या स्वच्छतागृहात ढकलले त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने स्वच्छतागृह बाहेरून बंद करून घेऊन तिला आज डांबून टाकले.

हिंगोली : प्रेमासाठी वाटेल ते करणाऱ्या सेनगाव  तालुक्यातील  दाताळा बुद्रुक  येथे एका अल्पवयीन मुलाने चक्क एका अल्पवयीन मुलीस प्रेमाची कबुली देण्यासाठी तीन तास स्वच्छतागृहात डांबून ठेवले. अखेर स्वच्छतागृहातून आलेल्या आवाजानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिची सुटका केली. याप्रकरणी त्या अल्पवयीन तरुणांसह अन्य एका विरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.२२) गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसात एकतर्फी प्रेमाच्या घटना वाढू लागले आहेत त्यातून विनयभंग व छळाची घटना होऊ लागली आहे. असाच एक प्रकार सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे घडला. गावातील एका अल्पवयीन मुलाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले. मात्र ती मुलगी या एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तिच्याकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठी त्या मुलाने अनेक वेळा प्रयत्न करून पाहिले. मात्र त्या मुलीने दाद दिलीच नाही.

दरम्यान शुक्रवारी (ता. २२) दुपारी साडेतीन वाजता ती मुलगी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी शाळेत जात असताना त्या अल्पवयीन प्रेमवीराने त्याचा मित्र विशाल कुंडलिक माने (वय 18) याला सोबत घेत त्या मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर त्या मुलीस रस्त्यात आडवले मात्र त्याला ढकलून देत मुलगी पुढे निघाली. यावेळी विशाल माने याने त्या मुलीस एका बंद घराच्या स्वच्छतागृहात ढकलले त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने स्वच्छतागृह बाहेरून बंद करून घेऊन तिला आज डांबून टाकले. माझ्या प्रेमाची कबुली असा तगादा लावला तू ओरडल्यास तुझ्या भावाला जिवंत मारून टाकू अशी धमकीही दिली. त्यामुळे ती मुलगी घाबरून गेली सुमारे तीन तास झाल्यानंतरही त्या मुलाकडून सुटका होत नसल्याने तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी स्वच्छतागृहाकडे धाव घेऊन मुलीची सुटका केली. मात्र या गोंधळात त्या रोडरोमियो मुलाने घटनास्थळावरून पलायन केले. त्या मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आज पहाटेच्या सुमारास सेनगाव पोलीस ठाणे गाठले. या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून एका अल्पवयीन मुलासह विशाल माने याच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपाधीक्षक ए. जी. खान, पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl absconding in toilet at Hingoli