मुलीवर अत्याचारप्रकरणी नांदेडच्या युवकास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) - मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करून ते डिलीट करण्याचे कारण पुढे करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नांदेड येथील मुलगी काही दिवस राहण्यासाठी येथील नातेवाइकांकडे आली होती. घरमालकाचा मुलगा कृष्णा भिकाजी भंवर (वय 19) याने संबंधित मुलीचे चोरून व्हिडिओ शूटिंग केले. काही दिवसांनी मुलगी आपल्या घरी नांदेडला परतल्यावर तिला ही बाब समजली. मोबाईलमधून शूटिंग काढून टाकण्याची (डिलीट) विनंती तिने केली. रविवारी घरी ये, तुझ्यासमोर शूटिंग डिलीट करतो, असे सांगून कृष्णा भंवरने तिला घरी बोलावून घेतले. त्या वेळी तिच्यावर अत्याचार केला.

पीडित मुलीने नांदेड गाठून पोलिस अधीक्षकांपुढे सर्व प्रकार सांगितला. नांदेडच्या खास पोलिस पथकासोबत तिला बाळापूरला पाठवले, चौकशी केली. बाळापूरचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी काल मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास संशयितास अटक केली. पीडितेच्या फिर्यादीवरून कृष्णा भंवर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: girl atrocity crime youth arrested