शेजारच्यांनी अशी केली बदनामी, की मुलगी आणि विवाहित तरुण....
जातेगाव (जि. बीड) - आई, बाळू काकांचं आणि माझं काहीच नव्हतं, शेजारच्यांनी साऱ्या गावात बदनामी केली, अशा आशयाची चिठ्ठी लिहून दहावीत शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय मुलीसह एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 19) समोर आली. शामल भरत चांभारे (वय 16) व बाळू विठोबा जाधव (वय 32, रा. दोघेही रा. जातेगाव, ता. गेवराई) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.
दहावीत शिक्षण घेणारी शामल सोमवारी घरातील कोणालाही आढळून आली नाही. याच वेळी गावातीलच विवाहित बाळू जाधवदेखील दिसत नव्हता. बाळूनेच शामल हिला पळवून नेल्याचा शामलच्या कुटुंबीयांना संशय होता. तशी तक्रार त्यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.
हेही वाचा - अबब...बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी!
दरम्यान, रविवारी शामल हिचा मृतदेह गावातीलच मनोहर मस्के यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. या वेळी विहिरीच्या काठावर शामलने लिहिलेली चिठ्ठीही आढळून आली.
हेही वाचा - नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!
"आई...माझे आणि बाळू काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो; मात्र शेजारच्या एका सरांनी आमचे साऱ्या गावात केले' असा मजकूर या चिठ्ठीत लिहिलेला होता. काही वेळाने बाळू जाधव याचाही मृतदेह याच विहिरीत आढळून आला. बाळू जाधव हा विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.