शस्त्रक्रियेच्या भीतीने मुलीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

शस्त्रक्रियेच्या भीतीने प्रिया सुभाष लोंढे (वय 11) या शालेय मुलीने गळफास घेऊन सोमवारी (ता.3) सायंकाळी आत्महत्या केली.

अंबाजोगाई - शस्त्रक्रियेच्या भीतीने प्रिया सुभाष लोंढे (वय 11) या शालेय मुलीने गळफास घेऊन सोमवारी (ता.3) सायंकाळी आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी प्रियाच्या जिभेखाली गाठ आली होती. वडिलांनी तिला रुग्णालयात नेले होते. तपासणीनंतर शस्त्रक्रिया करून गाठ काढावी लागेल, असा सल्ला डॉक्‍टरांनी तिच्या वडिलांना दिला. डॉक्‍टर व वडिलांचे बोलणे प्रियाने ऐकले होते. शस्त्रक्रिया होणार, या कल्पनेने ती घाबरली होती. या भीतीपोटी तिने घरी ओढणीने गळफास घेतला. तिच्या आईने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl committed suicide for fear of surgery

टॅग्स