डोक्यात सोलरची टाकी पडून चिमुकलीचा मृत्यू, बीडची हृदयद्रावक घटना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

बीड जिल्ह्यातील युसूफ वडगाव येथे डोक्यात सोलरची टाकी पडल्याने अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. दहा) येथे घडली. हिंदवी संदीप निकम असे या मुलीचे नाव आहे.

युसूफ वडगाव (जि. बीड) -  डोक्यात सोलरची टाकी पडल्याने जखमी होऊन अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. दहा) येथे घडली. हिंदवी संदीप निकम असे या मुलीचे नाव आहे.

येथील सैन्यात असलेले संदीप निकम सध्या आसाम देशसेवा करत आहेत. त्यांची पत्नी आणि चिमुकली हिंदवी हे दोघे जण गावी युसूफ वडगाव (ता. केज) येथे असतात. हिंदवीची आई सकाळी दवाखान्यात गेल्यानंतर हिंदवी आजीसोबत होती. गच्चीवर खेळत असताना तिने सोलरच्या टाकीच्या अँगलला पकडले.

हेही बघा - Video:कोरोना हरेल...माझा देश जिंकेल...!

अचानक ती टाकीच या चिमुकलीच्या अंगावर पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. अतिशय चंचल आणि गोड गोंडस असणाऱ्या चिमुकल्या हिंदवीच्या अशा दुदैवाने जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. 
 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl dies in Beed district