स्वच्छतागृहाच्या टँकमध्ये पडून चिमुरडीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

या माहिती नंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे जमादार वाय. जे. वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर संस्कृतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील लोहारा खुर्द येथे स्वच्छतागृहाच्या टँकमध्ये पडून सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.नऊ ) पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

औंढा तालुक्यातील संस्कृती विकास वरेड ही सहा वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत आजोबांकडे राहते लोहरा खुर्द गावाजवळ एका शेतात घराचे बांधकाम केले जात आहे. याठिकाणी स्वच्छतागृहाचे टँक बांधण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 8) संस्कृतीही दुपारपासूनच बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला होता. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तिच्या कुटुंबीयांनी स्वच्छतागृहाच्या टॅकमधे पाहणी केली असता संस्कृतीचा आढळून आला.

या माहिती नंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे जमादार वाय. जे. वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर संस्कृतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: girl drown in tank at Hingoli