बालानगर येथे गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

गुन्हा
गुन्हा

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : बालानगर (ता. पैठण) येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 15) घडली आहे. कोमल शंकर पाटोळे (वय 15) असे युवतीचे नाव आहे.


एमआयडीसी पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालानगर येथील कोमल पाटोळे हिने ती राहत असलेल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आले. परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यास कळविले. पोलिसांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com