नदीवर तरंगणारे मृत अर्भक सापडले, ग्रामपंचायतीने केले अंत्यसंस्कार

Latur News
Latur News

चाकूर (जि. लातूर) : घरणी गावातील नदीच्या पाण्यावर तरंगत असलेले स्त्री जातीचे मृत अर्भक गुरुवारी (ता.१२) सकाळी गावकऱ्यांना सापडले. कोणत्या तरी वैरी मातापित्यानं हे अर्भक नदीत सोडलं असावं, हे स्पष्ट असलं, तरी या 'नकोशी' च्या मातेचा पोलिस शोध घेत आहेत.

चाकूर तालुक्यातल्या घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर अर्भक तरंगत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. ही माहिती गावात समजल्यानंतर नदीकाठावर ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. सकाळी बाराच्या सुमारास पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाण्यातून त्याला बाहेर काढले असता, ते स्त्री जातीचे असल्याचे समजले.

याचा पंचनामा करून नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अशोक चिंते यांनी दिलेल्या तक्रारीवरून, अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्त्री-भ्रूण हत्या होऊ नयेत, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असताना हे अर्भक कोणी आणून टाकले अथवा अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक आहे, याची ग्रामस्थांत चर्चा आहे. अर्भकाची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com