तरूणीचा विनयभंग करणाऱ्या नांदेडच्या तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

हिंगोली येथील एक तरुणी सीईटीच्या क्लासेस साठी नांदेड ते गेली होती. क्लासेस पूर्ण झाल्यानंतर ती तरुणी काही दिवसापूर्वी हिंगोलीत परत आली. त्यानंतर नांदेडच्या श्रीनगर भागातील रुपेश मुन्नेश्वर हा तरुण  हिंगोलीत आला.

हिंगोली : हिंगोली शहरामध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी नांदेड येथील एका तरुणाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी तारीख 22 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. 

हिंगोली येथील एक तरुणी सीईटीच्या क्लासेस साठी नांदेड ते गेली होती. क्लासेस पूर्ण झाल्यानंतर ती तरुणी काही दिवसापूर्वी हिंगोलीत परत आली. त्यानंतर नांदेडच्या श्रीनगर भागातील रुपेश मुन्नेश्वर हा तरुण  हिंगोलीत आला. मंगळवारी दुपारी ती तरुणी दुचाकीवर जात असताना रुपेशने तिचे दुचाकी वाहन अडवून तू माझ्याशी का बोलत नाही, तुझे काढलेले फोटो फेसबुक वर टाकून बदनामी करेल अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी त्या तरुणीच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रेमलता गोमासे यांच्या पथकाने तपास सुरू केला असून रुपेश यास अटक केली आहे.

Web Title: girl molestation in Nanded