चाकूचा धाक दाखवून बकापुरात तरुणीवर बलात्कार

चित्र
चित्र

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : बकापूर (ता. औरंगाबाद) येथे चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केला. ही घटना 31 ऑगस्ट रोजी घडली. याबाबत सोमवार ता. नऊ सप्टेंबरला रात्री फुलंब्री पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


बकापूर येथे 19 वर्षीय तरुणी घरात एकटी असताना बिल्डा (ता. फुलंब्री) येथील कृष्णा मुळे याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याच्यासोबत दोघे मित्र होते. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी कृष्णा मुळे याची पीडित तरुणीसोबत अनेक वर्षांपासून ओळख होती.

खामगाव गोरक्ष येथे अकरावीला शिक्षण घेत असताना दोघे अनेकवेळा दुचाकीवर शाळेत गेलेले आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कृष्णा मुळे हा सैन्यदलात भरती झाला. बकापुरात 31 ऑगस्टला पीडित तरुणी घरी एकटी असताना कृष्णा मुळे, त्याचे मित्र विशाल सपकाळ, सागर देशमुख हे तिघे तेथे आले. कृष्ण मुळे याने घरात जाऊन पीडित तरुणीच्या गळ्यावर चाकू लावला. "माझ्यासोबत लग्न कर, नसता तुझ्या आई, वडील व भावाला मारून टाकीन,' अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री. खंदारे पुढील तपास करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com