वाळू तस्करीमुळे विद्यार्थिनीचा बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

गेवराई - अवैध वाळू उपसा बंद असल्याची टिमकी महसूल विभाग वाजवित असले तरी विद्यार्थिनीचा बळी गेल्याने पुन्हा एकदा तालुक्‍यातील वाळू तस्करी चव्हाट्यावर आली आहे. अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात गुरुवारी (ता. १५) महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला. 

निकिता रामदास जाधव (वय १६, कोमलवाडी, ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आता तरी महसूल प्रशासन अवैध वाळू उपशावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्‍यातील कोमलवाडी येथील रामदास जाधव यांची मुलगी निकिता शिकवणीसाठी बीडला जात होती. वडील रामदास जाधव यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच-२३, ७५७७) गेवराई मार्गे बीडला जात असताना गेवराई जवळील जमादारणीच्या पुलाजवळ पाठीमागून येणाऱ्या विनानंबरच्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरने जोराची धडक दिली. यामध्ये निकिता जाधव ही जागीच ठार झाली; तर तिचे वडील रामदास जाधव हे गंभीर जखमी झाले. रामदास जाधव यांना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी गेवराई पोलिस स्टेशनचे एस. आर. आईटवार, पोलिस नायक गणेश तळेकर, श्री. नांगरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनेनंतर ट्रॅक्‍टर चालक फरार झाला. दरम्यान, या अपघातामुळे गेवराई तालुक्‍यातील वाळू तस्करी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

Web Title: Girl Student Death by Accident Sand Smuggler Crime