मुलासोबत असलेली मैत्री कुटुंबीयांना आवडत नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

औरंगाबाद - मुलासोबत असलेली मैत्री कुटुंबीयांना आवडत नसल्याने एका महाविद्यालयीन तरुणीने भावनिक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (ता. सात) पडेगाव, मिटमिटा येथील हाश्‍मी पार्क, दिशा नियोसिटीत घडली. पायल पांडुरंग गायकवाड (वय १८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

गायकवाड कुटुंबीयांनी सहा महिन्यांपूर्वीच दिशा नियोसिटीत किरायाने घर घेतले होते. पायलने सरस्वती भुवन महाविद्यालयातून नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. चार वर्षांपूर्वी तिच्या आईनेही आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. पायलचे वडील इस्रीकाम करतात. पायलने घरातील छताच्या पंखाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्येपूर्वी पायलने लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळावर पोलिसांना आढळली. ‘जशी मैत्रीण असते तसाच मित्र असतो. मग मुला-मुलीच्या मैत्रीत गैर काय,’ असा भावनिक प्रश्‍न तिने चिठ्ठीत उपस्थित करून जीवनयात्रा संपविली.

भावनिक विवंचनेत सापडलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढते. अशांना भावनिक व मानसिक आधाराची गरज असते. योग्य संवाद साधून उपाययोजना केल्यास अशा घटना टाळता येतील. 
- डॉ. संदीप सिसोदे, समुपदेशक.

Web Title: girl student suicide