नववीच्या विद्यार्थिनीची औरंगाबादेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

औरंगाबाद - अंगात कराटेचा गणवेश, गळ्यात पदक घालून श्रुती रामदास गव्हाणे (वय 15, रा. मूळ हळदा, जि. औरंगाबाद) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास शहरातील मयूरपार्क परिसरातील शिक्षक कॉलनीत घडली.

पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुती सरस्वती भुवन शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे वडील शिक्षक असून, ते सकाळी शाळेत गेले होते. आई बाहेरगावी होती. घरात एकटी असलेल्या श्रुतीने आज सकाळी अकराच्या सुमारास कराटेचा गणवेश परिधान केला आणि कराटेमधील मिळालेले पदकही गळ्यात घातले व त्यानंतर गळफास घेतला.

या कारणाची शक्‍यता
श्रुती कराटेच्या क्‍लासला जात होती; परंतु तिचा क्‍लास काही महिन्यांपासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी घराची तपासणी केली; मात्र चिठ्ठी आढळून आली नाही.

Web Title: girl student suicide