सहलीचे पैसे न भरल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

तीर्थपुरी - मुरमा येथील शीतल श्‍यामसुंदर मुकणे (वय 15) या मुलीने शाळेतील सहलीचे पैसे न भरल्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.8) सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुरमा (ता.घनसावंगी) येथे घडली.

शीतल मुकणे व तिचा भाऊ तीर्थपुरी येथील एका विद्यालयात शिक्षण घेत होते. शीतल नववीत होती. शाळेची सहल जाणार असल्याने तिच्या वडिलांनी केवळ मुलाचे सहलीचे पैसे भरले. त्यामुळे शीतल नाराज होती. आईने सांगितलेल्या कामाला नकार देत, घरात जाऊन झोपत असल्याचे तिने सांगितले. थोड्यावेळाने तिची मैत्रीण घरी आली. तिने घराचा दरवाजा ठोठावला; परंतु शीतलने प्रतिसाद दिला नाही. आईने खिडकीतून डोकावून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.

Web Title: girl student suicide