विनयभंग झाल्याने युवतीची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व त्याच्या आई- वडिलांसह सिंदखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.

नांदेड : विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व त्याच्या आई- वडिलांसह सिंदखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.

माहूर तालुक्यातील नाईकवाडी येथे शुक्रवारी (ता. 17) आरोपी अविनाश रमेश राठोड याने गावातील एका 16 वर्षीय मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग केला. त्यावेळी विनयभंग करताच पीडित मुलीने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने तिथून पळ काढला. घडलेला सर्व प्रकार मुलीने आपल्या आई- वडिलांना सांगितला. मुलीच्या आई वडिलांनी आरोपी अविनाश राठोडच्या घरी जाऊन घडलेला प्रकार त्याच्या आई-वडिलांना सांगितला. यावेळी आरोपीच्या आई-वडिलांनी मुलास समजावून सांगण्याऐवजी मुलीचीच बदनामी केली.

ही बदनामी मुलीला सहन झाली नसल्याने तिने शनिवारी (ता.18) रात्री 11 च्या सुमारास किटकनाशक प्राशन केले. एवढेच नाही तर गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी, मुलीचे नातेवाईक केशव रामजी पवार यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून अविनाश रमेश राठोड, छबुबाई राठोड आणि रमेश राठोड यांच्याविरूद्ध विनयभंग व आत्महत्येस पारवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करत आहेत.

Web Title: girl suicide after molestation