प्रियकराच्या खूनाची प्रेयसीने दिली सुपारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

हिंगोली : वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या पंचविस हजारात खूनाची सुपारी त्यांच्या प्रेयसीनेच दिल्याचे कुरूंदा पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. 

हिंगोली : वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या पंचविस हजारात खूनाची सुपारी त्यांच्या प्रेयसीनेच दिल्याचे कुरूंदा पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. 

पारवा येथील श्री कदम हे मागील वीस दिवसांपासून बेपत्ता होते. काल (शुक्रवारी)  त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र आज (शनिवारी) पहाटे यांचा मुलगा संदीप कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये त्यांचा अनैतिक संबंधातून तसेच दोन एकर जमीन नावावर का करुन देत नाही या कारणावरून त्यांचा खून केल्याचे तक्रारीत नमूद केले. यावरून सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार शंकर इंगोले, तुकाराम आम्ले, प्रकाश नेव्हल, यादव वाघमारे यांच्या पथकाने कुंताबाई मदन अडकिणे, बालाजी कदम यांना अटक केली तर विठ्ठल कदम हा फरार आहे . 

पोलिसांच्या चौकशीत कुंताबाई हिने मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाची पंचवीस हजार रुपयांमध्ये सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले. बालाजी कदम व विठ्ठल कदम या दोघांनी मुरलीधर कदम यांना दारू पाजवून त्यांचा सारंगवाडी माळरानावर नेऊन गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांचे वाहन जिंतूर तालुक्यात पाचेगाव शिवारात नेऊन टाकल्‍याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

Web Title: girlfriend kill his lover