शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले अब्दुल सत्तार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

तालूक्‍यात परतीच्या पावसाने झालेल्या नूकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी तालूक्‍यातील शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सिल्लोड (जि.औरंगाबाद ) : तालूक्‍यात परतीच्या पावसाने झालेल्या नूकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी (ता.15) उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्यासह तालूक्‍यातील शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

नदीकाठालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीजमीनी देखील वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाईची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे थकीत कर्ज व वीज बिल वसुलीची सक्ती थांबविण्यात यावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Image result for abdul sattar
आमदार अब्दुल सत्तार

हेही वाचा - बायकाे छळते? इथे मिळेल आधार

यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी, सहायक गटविकास अधिकारी ज्योती राठोड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भालेराव, महावितरणचे सहायक अभियंता अंकूश कौरवार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्री. सत्तार म्हणाले की, ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे मनोधैर्य खचू नये, यासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडलेला आहे.

हेही वाचा - तरुणी, महिलांना छेडता का बेट्यांनाे? मग घ्या

अतिवृष्टीमुळे हातची पिके उध्वस्त झाली आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रघुनाथ चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, दामोदर गव्हाणे, सतीश ताठे, कौतिकराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद राठोड, देविदास लोखंडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, सुदर्शन अग्रवाल, शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, शेख सलीम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Compensation To Sillod Taluka Farmers - Abdul Sattar