पीडितांना न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - चंद्रकांत हंडोरे

योगेश पायघन
शनिवार, 16 जून 2018

औरंगाबाद : तीन वर्षात अन्याय अत्याचार वाढले आहे. संघ, भाजप, शिवसेना याला खतपाणी घालत आहेत. उदगीरला युवकाला मारहाण, वाकडी येथील मुलांना नग्न करून मारहाण हे  घृणास्पद प्रकार आहे. शासनातील पक्षाचा पोलिसांवर दबाव दिसतोय. वाकडीच्या पीडित दोन्ही मुलांना न्याय मिळाला नाही तर रस्तावर उतरू व न्यायालयीन लढाही लढू असा इशारा भीमशक्तीचे संस्थापक व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दिला. 

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील पीडित दोन्ही मुलांची भेट घेऊन आल्यावर त्यांनी शहरात शनिवारी सुभेदारी विश्राम गृह येथे पत्रकार परिषद घेतली. अन्याय अत्याचाराच्या प्रकारात पुनर्वसन करण्याचे काम मी काँग्रेस शासनाच्या काळात सामाजिक न्याय मंत्री असतांना केले. या पीडितांनाही न्याय मिळावा त्यासाठी सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी करणार असल्याचे हंडोरे यांनी सांगितले. पोलिसांना या घटनेचे गांभीर्य कळले असले तरी जमीनदार व सत्तेतील पक्षाच्या दबावामुळे या केसमध्ये हलगर्जी झाल्याचे दिसते. मात्र या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याने पोलिसांनी पुन्हा स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. मारहाण, आय टी ऍक्ट व अट्रोसिटी ची कलमे पोलिसांनी लावले  आहेत. अशा घटना घडू नये म्हणून समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. असे हंडोरे म्हणाले. यावेळी भीमशक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: give justice to victim otherwise will strike