'मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

उदगीर : मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, अशा घोषणा मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात मराठवाडा स्वतंत्र राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

उदगीर : मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, अशा घोषणा मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात मराठवाडा स्वतंत्र राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

मराठवाडा साहित्य परिषद आणि परिषदेच्या उदगीर शाखेच्या वतीने आयोजित 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर डॉ. ऋषिकेश कांबळे अध्यक्षीय भाषणासाठी उठले. तेंव्हा कार्यकर्त्यानी व्यासपीठावर येऊन या घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन कांबळे यांना दिले.

Web Title: Give Marathwada the status of an independent state; Announcement at the Literature Convention