सत्ता द्या, शहराला झोपडपट्टीमुक्त करू!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

बीड - ""मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी सलीम जहांगीर यांना उमेदवारी दिली आहे. आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे. आम्ही दिलेला निधी खर्च करण्यासाठी बीड पालिकेची सत्ता द्या,'' असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. सत्ता आल्यास शहर झोपडपट्टीमुक्त करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

बीड पालिका निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलीम जहांगीर व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. 24) झालेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या वेळी माजी आमदार आदिनाथ नवले, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रिपाइं युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, उमेदवार सलीम जहांगीर, राजेंद्र बांगर, चंद्रकांत फड, सर्जेराव तांदळे यांची उपस्थिती होती. श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या, मला वेळ देता येत नसल्याने सक्षम कार्यकर्ते तयार केले आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी मुस्लिम समाजाला प्रवाहात आणण्याचे काम केले होते. त्याचाच एक भाग म्हणून श्री. जहांगीर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. कोणाच्या घरफुटीचा आनंदोत्सव साजरा करू नका. त्याच्या वेदना काय असतात, हे मला माहीत आहे, असेही त्या म्हणाल्या. स्वत:ला मोठेपण मिरवण्यासाठी विनायक मेटे आपल्यावर टीका करत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Give power to the city free of slums