वंचित समाजाला मुख्यमंत्रिपदाची संधी द्या

विजय वडेट्टीवार; ओबीसी समाजासाठी सत्तेचा वापर
BEDD
BEDDSAKAL

बीड : जे वंचित आहेत, त्यांनाच वंचितांच्या वेदना माहीत आहेत. सध्या गृहीत धरले जात असल्याने ओबीसींनी ताकद दाखवावी लागेल. दिल्लीत महिनाभर तळ ठोकून बसण्याची तयारी ठेवावी लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. वंचित

समाजातील लोकांना मुख्यमंत्रिपदाची संधी का मिळत नाही, असा सवाल करत त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ओबीसी संख्येने अधिक असले तरी विखुरलेले आहेत. आता आरक्षण टिकविण्यासाठी एकत्रित या, असे आवाहन करून ओबीसींचा सत्तेत सहभाग वाढला तरच समाजाचे प्रश्न सुटतील, असेही श्री. वडेट्टीवार म्हणाले.

रविवारी (ता. २६) आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. संघटनेचे बबनराव तायवाडे, माजी आमदार नारायण मुंडे, शफी अन्सारी, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. पी. टी. चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, विष्णू देवकते, अर्जुन दळे, विष्णू देवकते उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून मेळाव्यास प्रारंभ झाला. विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘अनेकजण सत्तेत येण्यासाठी ओबीसींचा आधार घेतात; पण मला आयुष्यात काही स्वत:साठी मिळवायचं नाही.

BEDD
निम्न तेरणा धरण शंभर टक्के भरले;पाहा व्हिडिओ

मी आधी सत्तेत आहे आणि या सत्तेचा वापर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी करीत आहे’. १२७ वी घटनादुरुस्ती केली; पण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच ठेवली. त्यामुळे ओबीसींमध्ये इतरांना सामावून घेऊन आरक्षण देता येणार नाही, असेही ते म्हणाले. अर्जुन दळे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. पी. टी. चव्हाण, जे. डी. शाह यांची भाषणे झाली. बबनराव तायवाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

मराठा समाजाला विरोध नाही

मराठा आरक्षणप्रश्नी मोर्चा काढलेल्या आमदार सुरेश धस यांनी विजय वडेट्टीवार यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, या इशाऱ्याचा धागा पकडून मंत्री वडेट्टीवारांनी माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, असे स्पष्ट केले. ओबीसींच्या वाट्यातून आरक्षण घेण्याला विरोध आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीतून आरक्षणाचा कोटा वाढविण्यासाठी ओबीसी मराठा समाजासोबत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आता आलो आहे, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

भुजबळ- मुंडेंची अनुपस्थिती

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आयोजित मेळाव्याला नागरी व पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे येणार असे जाहीर केले होते. मात्र, या नेत्यांची अनुपस्थिती होती. विशेष म्हणजे काही नेते रविवारी जिल्ह्यात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com