गोदाकाठच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार कायम

goda.jpg
goda.jpg

सोनपेठ : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरुवात झालेली आहे. परंतु तालुक्यातील गोदाकाठच्या सात गावांच्या मतदानावरील बहिष्कार कायम दिसून येत आहे. तसेच तालुक्यात सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे देखील मतदानावर चांगलाच परिणाम दिसून येत आहे. 

तालुक्यातील लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लोहिग्राम या गावांचा रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार असल्यामुळे या सात गावातील एकूण पाच मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजेपर्यंत एकही मतदान झालेले नाही.

तेथील एकही नागरिक मतदान केंद्राकडे फिरकलाच नसल्याची माहीती मिळत आहे. विशेष बाब म्हणजे संबधित पाच मतदान केंद्रावर कुठलाही उमेदवार प्रतिनिधी देखील उपस्थित नसल्याची माहीती मिळत आहे. तालुक्यातील इतर भागात मतदानाला अतिशय संथ गतीने सुरुवात झाली असून, मतदानावर पावसाचा परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com