हजारो भाविकांनी केले गोदावरीत स्नान

Godavari Mahamatotsav starts on Friday
Godavari Mahamatotsav starts on Friday

नांदेड - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘गोदावरी महामहोत्सव’ला
शुक्रवारी सुरवात झाली. सोमवती अमावस्या असल्यामुळे परिसरासह परराज्यांतूनही शहरात दिंड्या दाखल झाल्या असून, गोदावरीच्या पवित्र पात्रामध्ये स्नान करण्यासाठी सोमवारी (ता.चार) भाविकांनी गर्दी केली
होती.

नांदेड शहराला ऐतिहासिकसोबतच धार्मिक वारसा आहे. त्यामुळे देशभरातून
भाविकांची शहरात नेहमीच वर्दळ असते. सचखंड गुरुद्वारा, गोदावरी नदी,
नंदगिरी किल्ला तसेच जिल्ह्यात कंधारला भुईकोट किल्ला, माहूरला रेणुका
देवी या स्थळांमुळे शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. हा वारसा जतन व्हावा, म्हणून गोदावरी महामहोत्सव घेतला जातो.

या महोत्सवामुळे शहराच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. शुक्रवारी या महामहोत्सवाला सुरवात झाली आहे. गुरुवारपर्यंत (ता. 7) हा महोत्सव चालणार असून, धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध विषयांवरील चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यांतूनही दिंड्यांच्या माध्यमातून या
महामहोत्सवामध्ये भाविक दाखल होतात. या वर्षी महामहोत्सवादरम्यान सोमवती अमावस्या असल्याने भाविकांनी गोदावरी घाटांवर पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. टाळ, मृदंगाचा गजर गरत पहाटेपासून दिंड्या गोदावरी घाटावर एकामाकून एक दाखल होत होत्या. त्यामुळे गोदावरीचा परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला. संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान महोत्सवात शनिवारी (ता. 2) केरळच्या धर्तीवर ‘मेडिकल टुरिझमला संधी’, रविवारी (ता. 3) ‘रेल्वे विकास’ या विषयांवर चर्चासत्र झाले. सोमवारी (ता. 4) ‘विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ व आत्महत्या’, ‘गोदावरी घाट कुंड निर्मिती व सुशोभिकरण-सौंदर्यीकरण’, मंगळवारी (ता. 5) ‘भाषा बोली लिपी उत्सव एक चर्चा’, बुधवारी (ता. 6) ‘शेतीसाठी माती परीक्षण काळाची गरज’, गुरुवारी (ता. 7) जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘अपिरल
गामेंट एक्सपोर्ट एक चर्चा’ या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com