गोदावरीच्या पुराचे पाणी जायकवाडीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पैठण - नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला आलेल्या पुराचे पाणी येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल झाले आहे. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत बुधवारी (ता. १८) पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. धरणात एकूण २४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी १५०३.७५ फूट (४५८.२९० मीटर) आहे. धरणात पाण्याची आवक ३१ हजार क्‍युसेक आहे. एकूण पाणीसाठा १२३०.४३० दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा ४९२.३३० दशलक्ष घनमीटर आहे. ही माहिती उपअभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. 

यंदाचा पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्याने पाणी येऊ शकले नाही. परिणामी दीड महिन्यात पाणीपातळीत घट होत गेली; परंतु दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला पूर येऊन पुराचे पाणी धरणाच्या दिशेने झेपावले. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या १९ टक्‍क्‍यांपर्यंत घटत गेलेल्या पाणीपातळीत वेगाने वाढ होण्यास सुरवात झाली. बुधवारी रात्रीपर्यंत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पाच टक्‍क्‍यांनी वाढ होऊन पाणीसाठा अंदाजे २४ टक्‍क्‍यांपर्यंत झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धरण नियंत्रण कक्षात पाणीपातळीची नोंद व पाणलोट क्षेत्रातील माहिती घेण्याचे काम जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने तातडीने सुरू केले आहे. कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, उपअभियंता अशोक चव्हाण, सहायक अभियंता बुध्दभूषण दाभाडे हे पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: Godavari river flood water in Jaikwadi