गोदावरीचे पाणी मराठवाड्यात दाखल

दीपक बरकसे
मंगळवार, 9 जुलै 2019

वैजापूर : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सोमवारी (ता. 8) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील (जि. औरंगाबाद) गोदाकाठच्या डोणगावात गोदेचे पाणी दाखल झाले. दरम्यान गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वैजापूर : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सोमवारी (ता. 8) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील (जि. औरंगाबाद) गोदाकाठच्या डोणगावात गोदेचे पाणी दाखल झाले. दरम्यान गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिक शहरात पूर परिस्थिती उद्भवली आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसाचा अप्रत्यक्ष फायदा मराठवाड्याला होतो. या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास दारणा समूहाच्या विविध धरणातील अतिरिक्त पाणी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी सोडण्यात येते. याशिवाय वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पातही पाणी सोडले जाते. धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाणी गोदावरी नदीच्या पात्रातून जायकवाडी जलाशयाकडे झेपावते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाऊस हा मराठवाड्यातील जनतेच्या फायद्याचा ठरतो. असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास नाशकातील धरणे पूर्ण क्षमतेने भरून नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे अतिरिक्त पाणी सोडले जाण्याची शक्यता जास्त आहे. गेल्या वर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीत जेमतेमच पाणी आले. परंतु दोन दिवसांपासून नाशकात संततधार सुरू असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी ओसंडून वाहायला लागली आहे.

तालुक्यातील गंगथडी भागातील  सीमेवरील पहिले गाव समजल्या जाणाऱ्या डोणगावात दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोदेमध्ये पावसाचे पाणी दाखल झाले. सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत असून गोदेचे पाणी जायकवाडी जलाशयाकडे झेपावत आहे. नाशिक जिल्ह्यात असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास नाशिकसारखी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दरम्यान गोदावरी नदी पाणी आल्यामुळे गोदाकाठच्या ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी कोरडीठाक असल्यामुळे गंगथडी भागातील नागरिकांना सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली होती. गोदावरी नदीच्या पात्रात पाणी आल्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाण्यामुळे विहिरींचे जलस्रोत वाढून मुबलक जलसाठा होण्यास मोठी मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Godavari river s water enters in Marathwada