महापालिकेत गटनेतेपदी गोजमगुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळविलेल्या भाजपच्या ३६ नगरसेवकांनी गटनेतेपदी शैलेश गोजमगुंडे यांची निवड केली आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे भाजपने पक्षीय गटाच्या नोंदणीप्रसंगी ही निवड केली.

महापालिकेच्या नियमानुसार निवडून प्रत्येक पक्षातील नगरसेवकांनी गट स्थापन करून औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे नोंद करावी लागते. त्यानुसार गटनेता निवडला जातो व गटनेत्याला पक्षाचा व्हीप बजावण्याचे अधिकार प्राप्त होतात. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी व युवा नेते अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ३६ नगरसेवकांनी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची गुरुवारी (ता. २७) औरंगाबादेत भेट घेतली. भाजपच्या गटनेतेपदी गोजमगुंडे यांची निवड करून ३६ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. नगरसेवक देविदास काळे, सुरेश पवार, नितीन वाघमारे, शैलेश स्वामी, चंद्रशेखर बिराजदार, दीपा गित्ते, रागिणी यादव, गीता गौड, समिना शेख यांच्यासह सर्व नूतन सदस्य उपस्थित होते.

Web Title: Gojamgunde as a group leader in the municipal corporation