चाकूचा धाक दाखवून उदगीरमध्ये सोने लंपास

Gold stole in Udgir latur
Gold stole in Udgir latur

उदगीर : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जबरी व मोठमोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. परवा झालेल्या त्रेचाळीस लाख रुपयाच्या घरफोडीच्या तपास अजून लागलेला नाही. असे असतानाच रविवारी (ता. 12) पहाटे साडेतीनच्या सुमारास एसटी कॉलनी परिसरातील शिवनगर येथे घरमालकाच्या गळ्याला सुरी लावून सहा तोळे सोने व आठ हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की एसटी कॉलनी परिसरातील शिवनगर येथे वास्तव्यास असलेले रेल्वेचे स्टेशन मास्तर दीपक जोशी हे आपल्या कुटुंबासमवेत घरी झोपले असतात रविवारी तारीख 12 ला पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात कोणीतरी प्रवेश केल्याची चाहूल लागल्यामुळे झोपेतून श्री जोशी यांना जाग आली त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी व मुलगी जागी झाली.

घर मालक जागे झाल्याचे चोरट्यांनी पाहिले व एका चोरट्याने आपल्या हातातील चाकू श्री जोशी यांच्या गळ्याला लावला व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोने काढून देण्याचे सांगितले. घरात असलेले सर्व सोने देण्याचे सांगितले. भीतीपोटी या कुटुंबाने त्यांच्या घरात असलेले सहा तोळे सोने त्यांना दिले व रोख आठ हजार रुपये आणि सहा तोळे सोने असा ऐवज चोरट्यांनी लुटून पोबारा केला.

या चोरी संदर्भात ग्रामीण पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे, चंद्रकांत कलमे आदींनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com