18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६) दुपारी दोनच्या सुमारास व्हीआयपी रस्त्यावर घडली. चोरट्यांनी दसऱ्यापूर्वीच आपली दिवाळी साजरी केल्याचे दिसून येते. 

नांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६) दुपारी दोनच्या सुमारास व्हीआयपी रस्त्यावर घडली. चोरट्यांनी दसऱ्यापूर्वीच आपली दिवाळी साजरी केल्याचे दिसून येते. 

शहराच्या विनायकनगर भागात राहणारे निवृत्त चंद्रकांत चिंतावार (वय ६०) हे दसरा सणानिमित्त पुजेसाठी बँक लाॅकरमध्ये ठेवलेले दागिणे काढण्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेत गेले होते. त्यांनी लॉकरमधील १८ तोळे सोन्याचे दागिणे असलेली बॅग काढून आपल्या दुचाकीवरुन घराकडे निघाले. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर त्यांनी भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथून काही किराणा सामान खरेदीसाठी आत गेले. यावेळी सोबत असलेली बॅग काऊंटरवर ठेवली. सामान घेऊन दुकानदाराला पैसे देण्याच्या नादात त्यांच्या पाळतीवर असलेल्या एका दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चीप्स घेण्याचा बहाणा करून चिंतावार यांची बॅग अलगद पळवून रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीवरून त्याने पळ काढला. थोड्या वेळाने चिंतावारच्या लक्षात आले की आपली बॅग नाही. त्यांना धक्काच बसला. घरी जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर परिवारासह शिवाजीनगर ठाणे गाठले.

पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, फौजदार गोपिनाथ वाघमारे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक चोरटा रस्त्यावर दुचाकीवर उभा तर एक दुकानात येऊन बॅग घेऊन जाताना दिसत आहे. त्यांना लवकरच अटक करून असे सुरवसे यांनी सांगितले. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Gold theft in Nanded