नांदेड : बुरखाधारी महिलांनी सोन्याच्या बांगड्या पळविल्या

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 29 मे 2019

नांदेडातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी एका दुकानातून सोन्याच्या दोन बांगड्या हातोहात लंपास केल्या.

नांदेड : येथील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी एका दुकानातून सोन्याच्या दोन बांगड्या हातोहात लंपास केल्या. ही घटना टाक ॲन्ड सन्स धानोरकर या दुकानात मंगळवारी (ता. 28) दुपारी घडली. 

सराफा बाजारात सुधाकर टाक यांच्या मालकीचे टाक अॅन्ड सन्स नावाची दुकान आहे. या दुकानात मंगळवारी दुपारी दोन बुरखाधारी महिला सोने खरेदीसाठी आल्या. सोन्याच्या बांगड्या दाखवित असतांना दुकानमालक व नोकरांचे लक्ष विचलीत करून त्यांनी हातचलाखीने एसजीटी 9160 होल मार्क लोहो अशा वर्णनाच्या 56 हजार रुपये किंमतीच्या साडेसतरा ग्राम वजनाच्या दोन बांगड्या लंपास केल्या. ही बाब सायंकाळी दुकान बंद करीत असतांना दागिने मोजतांना लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्ही फोटेज तपासले. यावेळी अनोळखी दोन बुरखाधारी महिलांनी त्या बांगड्या लंपास केल्याचे समजले. यावरून दुकानमालक सुधाकर टाक यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्री. आडे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold was stolen at Nanded