esakal | Good News : हिंगोली जिल्ह्यात १, २०० रेमडीसीव्हर इंजेक्शनचा साठा उपलब्ध

बोलून बातमी शोधा

file photo

औषधाची विक्री एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री झाल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने यांनी दिला आहे. 

Good News : हिंगोली जिल्ह्यात १, २०० रेमडीसीव्हर इंजेक्शनचा साठा उपलब्ध
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने अनेक रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा जवळपास १, २०० इतका साठा खासगी रुग्णालयाशी संलग्न मेडीकल व इतर मेडीकल स्टोअर्ससह शासकीय रुग्णालयात उपलब्ध असून कुठेही या औषधाची विक्री एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री झाल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने यांनी दिला आहे. 

सध्या हिंगोली जिल्ह्यासाठी रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा नागपूर येथून होत आहे. हिंगोली जिल्ह्यात रेमडीसीव्हीर इंजेक्शनसाठी असलेले वितरक ज्यामध्ये राजयोग डिस्ट्रीब्युटर्स, तिरुपती फार्मा व जिल्ह्यातील विक्रेत्यांना रेमडीसीव्हीर इंजेक्शन मागविण्यासाठी जिल्ह्यातील वितरकात गुरु फार्मद्वारका हॉस्पीटल एनटीसी, दिवेश मेडीकल जगदंब हॉस्पीटल बळसोंड, राजेश्वर मेडीकल तिरूमला हॉस्पीटल तिरुपती नगर, राजयोग मेडीमार्ट इंदिरा चौक असे आहेत. रेमडीसीव्हीर या औषधाची विक्री करताना औषध विक्रेत्यांनी डॉक्टराचे ओरीजनल प्रिस्क्रिप्शन , रूग्णाचा कोब्बिड पॉझिटिव्ह रिपोर्ट , सिटीस्कॅन रिपोर्ट व रूग्णाचे आधार कार्डच्या प्रती घेऊन औषधाची विक्री करावी तसेच डॉक्टरांनी चिट्टीवर त्यांचे नाव , शिक्षण , रजिस्टेशन क्रमांक , स्वाक्षरी , रूग्णाचे नाव व कोविड़ पॉझिटिव्ह असल्या बाबतचा स्पष्ट अभिप्राय या बाबी
नमूद कराव्यात.

हेही वाचा - हिंगोली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी ज्ञानबा कवडे यांची बिनविरोध निवड

औषधी विक्रेत्यांनी उपलब्ध कागदपत्राची  शहानिशा करून औषधाची विक्री करावी तसेच विक्री करतेवेळेस औषधी विक्री केल्याबाबत डॉक्टराच्या मुळ चिट्ठीवर सप्लाईड हॉस्पीटल बाबतचा रबरी शिक्का मारवा व औषधी विक्री, रूग्णाबाबतचा तपशील आदी बाबी जतन करणे बंधनकारक आहे.या बाबतचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितावर औषये व सौंदर्यप्रसाधने कायदा व त्या अंतर्गत नियमाखाली कारवाई केली जाईल. तसेच सदर औषधाची विक्री एमआरपीपेक्षा अधिक दराने करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालय  संपर्क साधावा असे आवाहन अत्र व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त बळीराम मरेवाड यांनी केले आहे.

रूग्णांनी हॉस्पीटल किंवा डॉक्टराकडे अनावश्यक रेमडीसीव्हीर इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शनची मागणी करू नये रुग्णांना जिल्ह्यात साधारणपणे खासगी रूग्णालयाशी जवळपास संलग्न मेडीकल स्टोअर्स व इतर मेडीकल व स्टोअर्समध्य सद्यस्थितीत १५० इतका साठा असून उपलब्ध आहे. तसेच शासकीय रूग्णालयात विक्री १०५० इतका साठा उपलब्ध आहे . घाऊक अन्न विक्रेत्यांनी नागपूर येथील पुरवठादाराकडे वितरकांनी इंजेक्शनची मागणी नोंदविलेली आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने इंजेक्शनचा आपतकालीन मुबलक साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले सद्यस्थितीत जात आहे. रूग्णांनी हॉस्पीटल किंवा इंजेक्शनच्या डॉक्टराकडे अनावश्यक रेमडीसिव्हीर इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शनची मागणी करु नये असे आवाहन केले आहे.

सद्यस्थिती रेमडीसिव्हर इंजेक्शन प्रारंभी औषधाचे विक्रेत्यांना नाव , कंपनी व किंमत पुढील प्रमाणे सिप्रीमी इंजेक्शन मागविण्यासाठी सिप्ला लि. ज्याची ४ हजार रुपये, जुबी- आर- इंजे. जनरल ज्युबीलॅन्ट फार्मा ज्याची किमत ४, ७०० रुपये, रिमेवीन इंजे. सनफार्मा ज्याची किंमत ३, ९६० रुपये , डिस्प्रेम इंजे., मायलॉनज्याची किंमत ४, ८०० रुपये , कोव्हिफॉर इंजे. , हिट्रोड्रग्ज ज्याची किंमत कब्रुवार ५, ४०० रुपये , रेमडॅक इंजे. झेड्यूज कॅडीला ज्याची एजन्सी किंमत ८९९ रुपये आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे