esakal | बीड जिल्ह्यातील ६७ प्रकल्प भरले तुडूंब, चार वर्षांत प्रथमच दमदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Water Project

बीड जिल्ह्यात चार वर्षांत पहिल्यांदाच वेळेवर आगमन झाले आणि आतापर्यंत दमदार पाऊस झाला आहे. वार्षिक सरारीच्या ६८ टक्के पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ६७ प्रकल्प तुडूंब भरले आहेत.

बीड जिल्ह्यातील ६७ प्रकल्प भरले तुडूंब, चार वर्षांत प्रथमच दमदार पाऊस

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जिल्ह्यात चार वर्षांत पहिल्यांदाच वेळेवर आगमन झाले आणि आतापर्यंत दमदार पाऊस झाला आहे. वार्षिक सरारीच्या ६८ टक्के पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ६७ प्रकल्प तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यात लघु, मध्यम व मोठे असे १४४ प्रकल्प आहेत. माजलगाव प्रकल्पातील पाणीसाठाही वाढून ६७ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प मात्र अजुनही तहानलेलाच आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६३८ मिमी असून आतापर्यंत ४३१ मिमीएवढ्या पावची नोंद झाली आहे. माजलगाव धरणाची पाणी साठवण क्षमता ४५४ दलघमी असून आता सधरणात २०९.३०० दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरणही तुडूंब भरले आहे. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ८१.४९६ दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ५३.८० इतकी आहे. एकुण १२६ लघु प्रकल्पांत १२१ दलघमी पाणीसाठा झाला आहे. याची टक्केवारी ४८.३९ टक्के आहे. चार वर्षात पहिल्यांदाच विक्रमी पाणीसाठा झाला आहे.

वाचा : उस्मानाबादला होणार नवीन विद्यापीठ, समिती देणार तीन महिन्यात अहवाल

३७ प्रकल्प ओसंडून वाहू लागले
यंदा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने ३७ प्रकल्प तुडूंब भरुन वाहत आहेत. यात सिंदफणा, महासांगवी व कुंडलिका या तीन मध्यम प्रकल्पांसह वंजारवाडी, कटवट, मौज, ईट, बेलोरा, खटकाळी, शिवणी, जुजगव्हाण, मणकर्णिका, लोकरवाडी, करचुंडी, मन्यारवाडी, मोरझलवाडी, पिंपळवंडी खोपटी, नारायणगड, धनगरजवळका, भायाळा साठवण तलाव, दासखेड, इंचरणा, लांबरवाडी साठवण तलाव, सौताडा साठवण तलाव, भुरेवाडी साठवण तलाव, वंसतवाडी साठवण तलाव, धामणगाव साठवण तलाव, घागरवाडा, जाधवजवळा, दैठेवाडी, धारुर, चिखलबीड, साळींबा, तिगाव, काळवटी, घाटनांदूर व करेवाडी या ३४ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top