केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या मदतफेरीला प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह अनेक सामाजिक, धार्मिक संस्था व राजकीय पक्ष पुढे आले आहेत. या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतुने भाजपच्या वतीने मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

नांदेड - केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुधवारी (ता. २२) भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. व्यापारी तसेच नागरिकांनी या मदतफेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मदत फेरीतून एक लाख एक हजार ३०४ रुपयांचा निधी जमा झाला.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह अनेक सामाजिक, धार्मिक संस्था व राजकीय पक्ष पुढे आले आहेत. या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतुने भाजपच्या वतीने मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील सराफा येथील भोजालाल गवळी चौकापासून जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रोतोळीकर, महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाजपाचे नेते डॉ. धनाजीराव देशमुख, प्रा. गणपतराव राऊत, प्रदेश कार्यकारीणी सदस्य अ‍ॅड. चैतन्य बापु देशमुख, व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रा. नंदू कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मदत फेरीला सुरवात झाली. सराफा बाजार, कापड मार्केट, जुना मोंढा, तारासिंह मार्केट, गुरुद्वारा चौक भागात मदत फेरीला व्यापारी तसेच नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Web Title: Good Responce to BJPs support for Kerala flood victims help