केंद्र सरकारच्या 'एम पासपोर्ट' योजनेला चांगला प्रतिसाद

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

- आठ महिण्यात नऊ हजार ‘पारपत्र'
- ‘पारपत्र' विभागाकडून मात्र दिरंगाई

नांदेड : केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एम- पासपोर्ट योजनेला नांदेडमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत आठ महिन्यात नऊ हजार पासपोर्ट (पारपत्र) देण्यात आल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातून शिक्षणासाठी किंवा नोकरी व व्यवसायासाठी किंवा पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकास पासपोर्ट असणे आवश्‍यक आहे. या पासपोर्टसाठी नागपूर, सोलापूर किंवा पूणे अशी वारी करावी लागत असे. त्यासाठी नांदेडकरांचा मोठा खर्च व वेळ वाया जात होता. परंतु फेब्रुवारी 2017 मध्ये सरकारच्या वतीने पासपोर्ट कार्यालयात गेल्यानंतर एम-पासपोर्टची सुविधा सुरू केली. राज्यात नांदेडलाही पोसपोर्ट कार्यालय सूर झाले. परंतु या टपाल कार्यालयाच्या ईमारतीत थाटलेल्या या कार्यालयात उदासिनता दिसून येते.

पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे स्कॅन होण्यास लागणारा विलंब, फोटो अपलोड न होणे यासह आदी बाबतीत या कार्यालयातून संबंधीतांना वेळेच्या आता पासपोर्ट मिळत नाही. मात्र पोलिस विभागाकडून याची तत्पर अमलबजावणी केल्या जाते. पारपत्र कार्यालयात एकादा व्यक्ती गेला की लगेच संबंधीत पोलिस ठाण्याच्या पासपोर्ट साईडवर पडते. त्यानंतर त्या ठाण्याचा पोलिस कर्मचारी संबंधीतांना फोन लावून त्यांच्या घरी जाऊन प्राथमीक माहिती घेतो. त्यानंतर लगेच व्हेरीफिकेशन करून पारपत्र मिळते. 
एम- पासपोर्ट ही सुविधा सुरू होऊन आठ महिणे झाले. एक फेब्रुवारी 2017 रोजी या सेवेची सुरूवात झाली. ते आजपर्यंत जिल्हाभरातून नऊ हजार 94 पारपत्र देण्यात आले. याचे सर्वाधिक प्रमाण नांदेड शहरात असल्याचे सांगण्यात आले.

मात्र टपाल कार्यालयाकडून पाहिजे असे हे काम तातडीने हत नसल्याने अनेकांचे पारपत्र रखडले असल्याचे सांगण्यात आले. या सेवेमुळे स्टेशनरीचा मोठा खर्च कमी झाला आहे.

Web Title: A good response to the Central Government's 'M Passport' scheme