मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्यभर निघालेल्या मुक मोर्चानंतर तुळपुर व बुधवारी परळीत हा ठोक मोर्चा निघाला.

बीड : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता.18) येथे काढण्यात आलेल्या ठोक मोर्चा आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आरक्षण जाहिर झाल्याशिवाय उठायचे नाही असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्यभर निघालेल्या मुक मोर्चानंतर तुळपुर व बुधवारी परळीत हा ठोक मोर्चा निघाला. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान विविध भागातून वाहनांनी मोर्चेकरी शहरात जमा झाले. सुरुवातील येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला कोपर्डी (जि. नगर) येथील पिडीतेच्या वडिलांच्या हस्ते पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. पुतळ्यापासून मोर्चेकरी घोषणा देत तहसिल कार्यालयाजवळील मैदानावर एकत्र आले. या ठिकाणी प्रमुख भाषणांमधून समाजाच्या प्रश्नांचा उहापोह करण्यात आला. शासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत मोर्चेकरी याच ठिकाणी होते. आरक्षण जाहिर होत नाही तोपर्यंत परळी सोडणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी आक्रमक घोषणाबाजी केली. शासनाविरोधी घोषणांनी परळी दणानून गेली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परळीत पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. शहर भगवेमय दिसत होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Good Response To The Maratha Kranti Thok Morcha At Parali