...तर देशातील मुस्लिमांचेही नागरिकत्त्व रद्द होईल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

औरंगाबाद : अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमधून भारतात स्थलांतरित होणाऱ्यांना नागरिकत्व देण्यासंबंधीचे विधेयक येत्या अधिवेशनात संसदेत मांडले जाईल. यात मुस्लिम आणि ज्यू वगळता सर्व जातीधर्माच्या लोकांना नागरिकत्त्व देण्यात येणार आहे. आज स्थलांतरित मुस्लिमांना नागरिकत्त्व नाकारणारे सरकार पुढे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्त्वही रद्द करू शकते, अशी भीती ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद : अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमधून भारतात स्थलांतरित होणाऱ्यांना नागरिकत्व देण्यासंबंधीचे विधेयक येत्या अधिवेशनात संसदेत मांडले जाईल. यात मुस्लिम आणि ज्यू वगळता सर्व जातीधर्माच्या लोकांना नागरिकत्त्व देण्यात येणार आहे. आज स्थलांतरित मुस्लिमांना नागरिकत्त्व नाकारणारे सरकार पुढे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्त्वही रद्द करू शकते, अशी भीती ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली. 

Aurangabad News

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांना "स्वातंत्र्यसैनिक श्‍यामराव बोधनकर पुरस्कार' आणि ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांना "इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना. वि. देशपांडे आणि ताराबाई लड्डा यांच्या हस्ते दोघांना सन्मानित करण्यात आले. 

उठाव केला पाहिजे 

स्वतंत्र भारतात नॅशनल सिटीझन रजिस्टर बनवताना अनेक जाती नागरिकत्त्वाच्या हक्कापासून वंचित राहिल्या. डिसेंबरमध्ये संसदेत सिटीझनशिप अमेंडमेण्ट बिल मांडले जाणार आहे. ते पारित होऊन कायदा बनल्यानंतर राज्यघटना मूळ स्वरूपात दिसणार नाही. मुस्लिम, ख्रिस्ती, आदिवासी यांना नागरिकत्वाचे अधिकार नाकारण्यापर्यंतही या सरकारची मजल जाऊ शकते. याविरोधात आपल्याला उठाव केला पाहिजे. संपूर्ण नागरिकत्त्वाच्या हक्कासाठी लढण्याचा विडा उचलला पाहिजे, असे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केले. 

Aurangabad News

डॉ. दुलारी कुरेशी यांचा सन्मान 

सत्काराला उत्तर देताना डॉ. दुलारी कुरेशी यांनी इंद्रायणी बोधनकर यांनी केलेल्या समाजकार्याचा आढावा घेत, त्यांच्या नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या काळी इतिहास संशोधन करताना आलेल्या अडचणी, इतिहासतज्ज्ञ वडील डॉ. रमेश शंकर गुप्ते आणि इतिहासप्रेमी पती रफत कुरेशी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच आजवर काम करू शकल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी ताराबाई लड्डा यांनी डॉ. कुरेशी यांनी इतिहास आणि वारसा संवर्धनासाठी राबवलेल्या चळवळीचा गौरव केला. 

अनुक्रमे 11 हजार रुपये आणि 5 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता. तीन) झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रा. राजाराम राठोड, डॉ. राघवेंद्र चाकूरकर, डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांची उपस्थिती होती. सुजाता जोशी-पाटोदेकर यांनी मानपत्रांचे वाचन केले. ऍड. अभय दारवट, प्रवीण बोबडे यांनी स्फूर्तीगीत सादर केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government could seize citizenship of Muslims