आता आरामात जा म्हैसमाळला! 

आदित्य वाघमारे
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद -  वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता संपुष्टात येणार आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ दरम्यानच्या रस्त्याला नवी झळाळी देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. 

औरंगाबाद -  वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता संपुष्टात येणार आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ दरम्यानच्या रस्त्याला नवी झळाळी देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. 

सुटी घालवण्यासाठी वीकेंडला औरंगाबादकरांच्या यादीत पहिली पसंती असलेल्या म्हैसमाळचे वातावरण अल्हाददायक असले तरी तेथे पोचण्यासाठी आता वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे गेल्या अनेक वर्षांपासून बुजवण्यात आले नसून ते अधिक खोल होत झाले आहे; मात्र आता ही गैरसोय दूर होणार आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने मंजुरी देत त्यासाठी ३६ कोटी १७ लाखांच्या निधीलाही हिरवा कंदील दिला आहे. या कामाला शासनस्तरावर मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी ‘सकाळ’ला दिली. या रस्त्याची लांबी ११.५ किलोमीटर एवढी असून, या रस्त्यासाठी प्रत्येक किलोमीटरमागे तीन कोटी १४ लाखांचा खर्च येणार आहे. 

घाट रस्ताही होणार चकाचक 
एकूण ११.५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यात दोन किलोमीटर घाट रस्त्याचा समावेश आहे. घाटातील वाट ही काँक्रिटची केली जाणार आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाणाऱ्या या रस्त्यावर काँक्रिटीकरण करून ही वाट मजबूत केली जाणार आहे. दहा मीटर रुंद होणाऱ्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंना दीड-दीड मीटरचा डांबरी शोल्डर तयार करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा गर्दीच्या वेळी दुचाकी वाहनांना होणार आहे. 

Web Title: The government has approved the new road from Khulatabad to Mhasamal Road