शासनाकडून चार लाख शेतकऱयांची हरभरा, तुरीची खरेदीच नाही

शासनाकडून चार लाख शेतकऱयांची हरभरा, तुरीची खरेदीच नाही

लातूर : शासनाने राज्यातील चार लाखांपेक्षा जास्त शेतकऱयांची तूर व हरभऱयाची हमी भावाने खरेदी केलेली नाही. हजारो शेतकऱयांना एसएमएस
पाठवूनही त्यांच्या मालाची खरेदी झाली नाही. आता आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱयांना एक हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहिर केले आहे. पण यात ज्यांना एसएमएस पाठवले गेले पण त्यांनी आपला माल खऱेदी केंद्रावर आणला नाही त्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी अनुदानपासूनच वंचित राहण्याची भिती आहे.

गतवर्षीच्या हंगामात तुरीचे मोठे उत्पादन झाले होते. राज्यातील गोदामे
पूर्णपणे भरली गेली. त्यात या वर्षी तूर व हरभऱयाचे मोठ्या प्रमाणात
उत्पादन झाले. गोदामांचा व  बारदान्याचा अभावामुळे सुरवातीपासूनच तूर व हरभरा खरेदी धिम्यागतीने झाली. वखार महामंडळाने राज्यातील
महामंडळाव्यतिरिक्त अन्य १८३ गोदामे भाड्याने घेतली. तीही भरली गेली.
बारदाना नाही, गोदाम नाही असे कारणे सांगत खरेदी केंद्र बहुतांश दिवस
बंदच राहिली. मुदतवाढीचे नाटकही झाले. शेवटी शासनाने तुरीची ता. १५ मेला तर हरभऱयाची ता. ११ जूनला खरेदी केंद्र बंद केली. हमी भावाने तूर व हरभऱयाची खरेदी करताना आॅनलाईन नोंदणीची अट टाकली होती.

अनेक अडचणीवर मात करीत राज्यातील सात लाख ७५ हजार ६९९  तूर व हरभरा उत्पादक शेतकऱयांनी अॉनलाईन नोंदणी केली होती. या पैकी तीन महिन्यात केवळ तीन लाख ६५ हजार १५ शेतकऱयांचाच माल हमी भावाने खरेदी केला आहे. उर्वरीत चार लाख दहा हजार ६८४ शेतकरय़ांचा माल शासनाने खरेदीच केलेला नाही. यात तुरीच्या एक लाख ९१ हजार ७६ व हरभऱयाच्या दोन लाख १८ हजार ६०८ शेतकऱयांचा समावेश आहे. या शेतकऱयांनी हमी भावापेक्षा बाराशे ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल कमी दराने बाजारात विकला आहे.

खरेदीचे नाटक संपल्यानंतर शासनाने आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱयांना एक हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहिर केले आहे. खरेदी केंद्रावर शासन एका शेतकऱय़ाची दररोज २५ क्विंटल तूर किंवा हरभऱयाची खरेदी करीत होते. या अनुदानासाठी प्रति हेक्टर दहा क्विंटल असे दोन हेक्टरपर्यंतच तूर किंवा हरभऱयाची खरेदी करण्याची अट घातली आहे. याचाही फटका शेतकऱयांना बसणार आहे.

आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱयांना एसएमएस पाठवून त्यांच्या मालाची खरेदी केली जात होती. पण हजारो शेतकरयांना एसएमएस पाठवले गेले. त्यांनी माल खरेदी केंद्रावर आणलाही. पण बरदाना नाही, गोदाम नाही असे कारणे सांगून परत पाठवले गेले. त्यात एक हजाराच्या अनुदानासाठी एसएमएस पाठवून तूर आणि हरभरा न आणलेल्या शेतकऱयांना अपात्र ठरविण्याचे आदेश शासनाने मंगळवारी (ता. १९) दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी देखील या अनुदानापासून वंचित राहण्याची भिती आहे. शासनाने याचा फेरविचार करण्याची गरज आहे.

शासनाने २०१७-१८ या हंगामात शेतकरय़ांची हमी भावाने खऱेदी केलेली तूर व हरभरा पुढील प्रमाणे आहे.

पिकाचा प्रकार--झालेली खरेदी-------लाभार्थी शेतकरी--एकूण खरेदी किंमत
तूर---- ३३,६७,१७७.४८ क्विंटल---२,६५,८५४---१८३५.११ कोटी
हरभरा---१३,६९,१८४.४६ क्विंटल----९९,१६१------६०२.४४ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com