शासकीय तंत्रनिकेतनला मर्सिडीजसह बंपर लॉटरी

अतुल पाटील
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतनला मर्सिडीज इंडिया कंपनीतर्फे 40 लाख रुपयांची मर्सिडीज सी-205 ही नवी कोरी कार मिळाली आहे. त्यासोबतच 25 लाखाची दोष दुरुस्ती करण्यास उपयुक्‍त झेन्ट्री तसेच दोन ऍडव्हान्स इंजिन्स दिले आहेत. महाविद्यालयासाठी बंपर लॉटरीच आहे. मर्सिडीज बेंझचे डीजीएम सुहास क्षीरसागर यांनी महाविद्यालयाकडे हस्तांतर केले. यावेळी तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची उपस्थिती होती.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ५ लोक, Shahed G Shaikh समाविष्टित, लोक हसत अाहेत, लोकं उभी आहेत आणि सुट

शासकीय तंत्रनिकेतन आणि मर्सिडीज कंपनीतर्फे दहा वर्षापासून महाविद्यालयात ऍडव्हान्स डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेकॅट्रॉनिक्‍स केंद्र सुरु आहे. महाविद्यालयात रविवारी (ता. 10) मर्सिडीज, झेन्ट्री, इंजिन यासह 9 प्रशिक्षणार्थींना प्रति प्रशिक्षणार्थी दीड लाख रुपये प्रमाणे 13 लाख 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दान केलेल्या संगणकाचा उपयोग करुन ई लॅब सुरु करण्यात आली आहे. आजी माजी विद्यार्थ्यांच्या दानातून कार बे उभारण्यात आले आहे. हस्तांतर, शिष्यवृत्ती वाटप यासह कार बे, ई लॅबचे उद्‌घाटन डॉ. अभय वाघ यांच्याहस्ते झाले.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ६ लोक, Kalyan Annapurne समाविष्टित, लोक हसत अाहेत, लोकं उभी आहेत

स्वतंत्र इमारतीत सेंटर ऑफ एक्‍सलन्स

तंत्रशिक्षणच्या डॉ. वाघ यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांचे स्वागत केले. ब्रिज कोर्स राबवण्यासोबत मेकॅट्रॉनिक्‍स कोर्स साठी एका स्वतंत्र इमारतीत सेंटर ऑफ एक्‍सलन्स निर्माण करावे. तसेच विद्यार्थी, समाज आणि तंत्रशिक्षणच्या इतर संस्थांनाही त्याचा लाभ घेता येईल. असेही डॉ. वाघ म्हणाले. मर्सिडीजच्या श्री. क्षीरसागर यांनी सहसंचालक, प्राचार्य यांच्यासह प्रशिक्षक सुदीन कुलकर्णी, समन्वयक प्रा. मकरंद भागवत यांनी केंद्राच्या टिकवलेल्या दर्जाबद्दल अभिनंदन केले.

यावेळी सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्राचार्य एफ. ए. खान, बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन सुधीर देशपांडे यांच्यासह आजी माजी मिळून 100 प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रतिभा कोल्हे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Polytechnic Mercedes Bumper Lottery