शासकिय विश्रामगृह बनले दारुड्यांचा अड्डा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

नांदेड : शासकिय विश्रामगृह दारुड्यांचा अड्डा बनला आहे. दारु पिण्यास व थांबण्यास मज्जाव करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे दारुड्यांनी डोके फोडले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नरसी येथे मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. 

नायगाव तालुक्यातील नरसी येथे सार्वजनीक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहात अधिकारी किंवा पदाधिकारी कोणी थांबत नाही. याचा फायदा याच भागात राहणारे दारुडे घेत आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून या विश्रामगृहात तळ ठोकणाऱ्या तीन दारुड्यांनी येथील कर्तव्यावर असलेल्या एका साफसफाई महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना दारु पिण्यास व या ठिकाणी कामाशिवाय थांबण्यास मज्जाव केला. यावेळी आम्हाला विचारणारी कोण म्हणून दगडाने तिचे डोके फोडले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला. 

जखमी महिलेवर नायगाव येतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी जखमी नागरबाई परसराम बळेगावे यांच्या फिर्यादीवरुन रामतिर्थ पोलिस ठाण्यात राजू जनाजी बागडे, गोविंदराव मारेती तुप्पेकर आणि शेख जब्बार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एस. एस. बनसोडे हे करीत आहेत. 

Web Title: government rest house using for drinkers