सरकारची चर्चा उधळून टाकू, छावा संघटनेने दिला इशारा

हरी तुगावकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

लातूर : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे सन्वयक नसणाऱयांना बोलावून घेवून त्यांच्याशी चर्चा करून सरकार हे आंदोलन
दडपवण्याचा प्रयत्न करीत आहे. आज सर्व समाज रस्त्यावर आहे. एक दोघांशी चर्चा आम्हाला मान्य नाही. ठोस निर्णय घेवून सरकारने चर्चेला समोर यावे अन्यथा ही चर्चाच उधळून टाकण्यात येईल. निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी येथे शुक्रवारी (ता. 27) पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे निघूनही राज्य शासनाने दखल घेतली नाही.
म्हणून उद्रेक सुरु आहे. तरुण बलिदान देत आहेत. राज्य शासन नुसत्या घोषणा करीत आहे. अंमलबजावणी मात्र काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनेत्री श्रीदेवीच्या मृ्त्यूचे दुःख होते पण शेतकरी आत्महत्या करीत
आहेत, आरक्षणासाठी तरुण बलिदान देत आहेत, त्याचे दुःख मात्र त्यांना होत नाही. यापुढे निवडणुकीसाठी ते आले तर त्यांच्या सभा उधळून लावल्या जातील, असा इशारा जावळे पाटील यांनी दिला.

केंद्र सरकार आता आर्थिक निकषावर आरक्षणाची चर्चा करीत आहे. ही तर छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांची मागणी होती. शासनाने एकतर आर्थिक निकषावर  तरी आरक्षण द्यावे अन्यथा मराठा समाजाला तरी आरक्षण द्यावे यात वेळ घालू नये, असे जावळे पाटील म्हणाले. राज्यात मराठा समाजातील आमदारांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी सुरु आहे. आमदारांनी ही स्टटंबाजी थांबवावी. विधानसभेत आवाज उठवून शासनानवर दबाव आणावा. राजीनामा देणे म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकल्यासारखे आहे. तुम्हाला समाजाने विश्वासाने निवडूण दिले आहे. असेच राजीनामे द्याल तर समाज माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये. लढण्याचे अनेक पर्याय
आपल्यासमोर आहेत. आत्महत्या हा मार्ग नाही, असे ते म्हणाले. आमदारापेक्षा मराठा समाजातील खासदारांनी राजीनामे दिले तर केंद्र सरकारला घाम फुटेल असे प्रदेशाध्य़क्ष विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले. आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे. तेथे शासनाने योग्य बाजू मांडणे गरजेचे आहे. तोपर्यंत शासनाने अण्णासाहेब  पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठी तरतूद केली, शैक्षणिक शु्ल्कात ५० टक्के सवलतीचा आदेश काढला, मेगा भरतीला स्थगिती दिली तर आक्रोश कमी होईल, असे भगवान माकणे म्हणाले.

Web Title: governments meeting get blink said chhawa sanghtana